Description
आध्यात्मिक संबंध: गुरु-शिष्य प्रेरणास्पद नात्याचा अर्थबोध
जरी भक्तियोग हा विविध योग पध्दतीतला सर्वोत्तम मार्ग समजला जातो, तरी एक मार्गदर्शक स्वीकारण्यात (ज्याला सामान्यपणे गुरु म्हणतात) वैदिक परंपरेत महत्व आहे. इंग्रजीमध्ये ज्याला टीचर म्हणतात त्याची संस्कृतमधील गुरु ह्या शब्दाशी तुलना करता येत नाही तसेच स्टूडंट हा शब्द ही शिष्य ह्या शब्दाशी तुलना होत नाही. अशा प्रकारे, गुरु-शिष्याची भूमिका आणि त्यांच्यातील नातेसंबंध हा एक गंभीर अभ्यासाचा विषय आहे. इतर नातेसंबंधा प्रमाणेच गुरु–शिष्य नातेसंबंधही निर्मळ विश्वासाच्या पायावर उभा असतो व त्यामध्ये वचनबध्दता, निष्ठा व परस्परांमधील सामंजस्य यावरून तो वृद्धिंगत होतो.
ह्या पुस्तकात समाविष्ट असलेले विविध विषय: शरणागती, तिचे महत्व, तिची पध्दती व तिचे ध्येय, हयात सद्गुरूंशी जवळीक साधण्याची आवश्यकता, भगवान, गुरु व शिष्य ह्या तिघांविषयी विवेचन आहे. गुरु शिष्यांच्या नात्याविषयी गंभीरता व दक्षतापूर्ण दोघानीही कर्तव्ये पार पडण्याची गरज आहे. याउप्पर हे पुस्तक, शिक्षा व प्रायश्चित्त ह्या विषयांवर प्रकाश टाकते. गुरूंनी शिष्याची परीक्षा घेणे आणि सर्व शिष्यांनी एकत्रितपणे प्रेम व सहकार्यांनी कार्य करणे. शिवाय या पुस्तकात गुरु-भक्तिचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे व त्याबद्दल चुकीच्या संकल्पनांचा उलगडा केला आहे. तसेच गुरु-शिष्य अंतरिक संबंध अत्यंत तपशीलवारपणे स्पष्ट केला आहे.
पुनरावलोकने:
मी शिफारस करतो की भक्ति आचरणांत आणणाऱ्या प्रत्येकाने ह्या पुस्तकाची शिकवण प्राप्त करावी व स्वतः आचरणात आणावी.
– परम पूज्य गोपाल कृष्ण गोस्वामी महारज (गवर्निंग बॉडी कमिश्नर, इस्कॉन)
भक्ति धीर दामोदर स्वामींनी अत्यंत महत्त्वाचा विषय अनेक दृष्टीकोनातून सादर केला आहे, सुरुवातीच्या अध्यायात शरणागतीच्या पहिल्या पायरीपासून शेवटच्या अध्यायात शिष्याने कशी प्रगती करावी याचे मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकातील प्रत्येक अध्याय शास्त्र वचनाने सुरू होतो व लेखक त्यामधून महत्वाचे बिंदू वर्तमान अथवा चिन्तनात्मक दृष्टीने स्पष्ट करतात. एकंदरीत, हे पुस्तक अनमोल योगदान आहे व बऱ्याच लोकांना याद्वारे, गुरु–शिष्य संबंध सुधारण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन व योग्य दृष्टीकोन प्राप्त होईल.
– परम पूज्य कदम्ब कानन स्वामी महाराज
गुरु-शिष्य नातेसंबंधांचा सर्व पैलूंना स्पर्श करणारे सर्वसमावेशक पुस्तक आहे, म्हणून ते चैतन्यदायी आणि उत्साहवर्धक आहे. असे पुस्तक जे तुम्हाला पुन्हा-पुन्हा वाचायला आवडेल, कारण या पुस्तकात भक्तिच्या अभ्यासाचे सार सुंदरपणे वर्णन केले आहे.
– श्रीमान् श्रीवास दास (ग्लोबल ड्यूटी ऑफिसर, पश्चिम अफ्रीका, इस्कॉन)
वैदिक संस्कृतीनुसार, गुरु शब्दाचा अर्थ ज्ञानाने परिपूर्ण असलेला व्यक्ती. दुसऱ्या शब्दांत ज्यांना आपापल्या क्षेत्रातील विशिष्ट विषयाचे परिपूर्ण ज्ञान आहे त्यांना गुरु म्हणतात. ‘आध्यात्मिक संबंध’ या पुस्तकात लेखकाने मोठ्या नम्रतेने, आपुलकीने व उत्कृष्टपणे गुरु-शिष्य संबंधा विषयी शाश्वत सत्य सादर केले आहे. हे पुस्तक निश्चितपणे जिज्ञासू तसेच अनुभवी साधक दोघांसाठी एक उद्बोधक मार्गदर्शक ठरेल.
– श्रीमती व्रज लीला देवी दासी (डायरेक्टर, इंस्टिट्यूट फॉर अप्लाइड स्प्रिचुअल टेक्नोलॉजी, अमेरिका)
Reviews
There are no reviews yet.